इस्त्रायल पंतप्रधान नेत्यानाहूंच्या घरावर ड्रोन हल्ला

19 Oct 2024 17:01:47

Prime Minister Netanyahu
 
जेरूसलेम : काही दिवसांआधी हमासचा प्रमुख याह्या सिनवार याच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. यानंतर आता इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी युद्ध थांबवण्यासाठी मोठे विधान केले. मात्र यानंतर हमासने प्रत्युत्तरात नेत्यानाहूंच्या घरावर हल्ला केला आहे. दिलेल्या एका बातमीनुसार, पंतप्रधान नेत्यानाहू आणि घरातील सदस्य घटनास्थळी उपस्थित नसल्याची माहिती आहे. 
 
हमासच्या दहशतवादी संघटनेचे मुख्य याह्या सिनवार यांची ओळख आहे. मात्र युद्धात सिनवारवर हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये हमासचे सिनवार जमीनीखाली गाडला गेला होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र आता प्रत्युत्तरात हमासने नेतान्याहूंच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या एका वृत्तानुसार, पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या सिझेरिया शहरातील खासगी निवासस्थानाला ड्रोनने पाळत ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. नेत्यानाहू यांच्या निवासस्थानाव्यतिरिक्त आणखी दोन ड्रोन लेबनॉन येथून डागले गेले होते. पण हवाई दलाने ते हाणून पा़डले गेल्याची माहिती आहे. यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे.
 
Powered By Sangraha 9.0