विधानसभेसाठी मतदार नोंदणीची 'ही' शेवटची संधी

18 Oct 2024 18:15:47

voting registration
 
 
 
ठाणे : ( Assembly Election 2024 )विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दि.१९ ऑक्टोबर ही शेवटची संधी आहे. ज्यांचे नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट झालेले नाही त्यांनी आजच नाव नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन ठाणे जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे.
 
लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नावच नसल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता. त्याचबरोबर नवमतदार झालेल्या नागरिकांनी अजूनही आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही. अशा मतदारांसाठी शनिवार दि.१९ ऑक्टोबर रोजी रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0