भारताचा संबंध नाहीच! निज्जरच्या खूनाच्या तपासात नवीन ट्विस्ट

18 Oct 2024 19:57:21

canada
 
ओटावा : खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या मृत्यूमुळे भारता आणि कॅनडा या देशांमधील तणाव वाढत असताना, या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. कॅनडाचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस यांच्या मते निज्जर याची हत्या रिपुदमन सिंग मलिक याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी झाली होती. थॉमस यांचे हे वक्तव्यं ट्रुडो यांच्या आरोपांहून अगदी विपरीत असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सदर प्रकरणात जोडी थॉमस या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर कार्यरत असल्यामुळे चौकशीला सामोरं जात आहेत. त्यांनी आपली निवेदनात म्हटले की, कॅनडातील शीख सांप्रदाय मात्र या निष्कर्षावर खुश नव्हता. तपास यंत्रणा मात्र, शेवटी याच निष्कर्षावर पोहोचली की, निज्जर याची हत्या मलिक याचा बदला घेण्यासाठी झाली होती. या खूनाचा तपास सुरु असल्यामुळे आम्हाला भारताला पुरावे सोपवता आले नाही असे मत थॉमस यांनी व्यक्त केले.

कोण होता रिपुदमन सिंह मलिक?
रिपुदमन सिंह मलिक हा एक खालिस्तानी दहशतवादी होता ज्याने एअर इंडिया फ्लाइट 182 कनिष्क मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता, ज्यात ३२९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. १९९०च्या दशकानंतर, कॅनडामध्ये खालिस्तानी राजकारणाची विषवल्ली फोफावली ज्या मुळे अनेक गट खालिस्तानी फुटीरतावाद्यांमध्ये अनेक गट पडले जे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. या अंतर्गतच, निज्जर याने मलिक हा गद्दार असल्याचा प्रचार सुरु केला होता. या वादाची परिणीती हत्यासत्रात झाल्याचा खुलासा झाला आहे.

जोडी थॉमस यांनी दिलेल्या निवेदनामुळे आणि निज्जर याच्या हत्येच्या तपासाला  मिळालेल्या नवीन दिशेमुळे कॅनडाच्या राष्ट्रध्यक्षांचे आरोप बिनबुडाचे आहेत हेच सिद्ध होत आहे.

 
Powered By Sangraha 9.0