नवी दिल्ली : भारतीय रेल्वे कडून प्रवाशांना दिवाळी निमित्त विशेष भेट देण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून आता आगाऊ आरक्षणाची मुदत कमी करण्यात आली असून, तिकीट आरक्षित करण्यासाठीची मुदत १२० दिवसांवरून ६० दिवस (प्रवासाचा दिवस वगळता) करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेच्या नव्या नियमानुसार, आता १२० दिवस नाही तर केवळ ६० आधी रेल्वे तिकीट आरक्षित करता येणार आहे. भारतीय रेल्वेने एआरपी म्हणजेच अॅडव्हान्स्ड रिझर्व्हेशन पीरियड दोन महिन्यांनी कमी केला आहे. रेल्वेचा नवीन नियम येत्या १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबर पर्यंत, केलेले सगळे बुकींग्स कायम राहतील. हा नवा नियम भारतीय नागरिकांसह परदेशी प्रवाशांनाही लागू होणार आहे. यासह ज्या रेल्वे गाड्यांचा एआरपी आधीच कमी आहे. त्यावर नव्या नियमाचा कोणताही परिणाम होणार नाही. यामध्ये गोमती एक्सप्रेस व ताज एक्सप्रेससारख्या गाड्यांचा समावेश आहे. लोकांच्या प्रवासाचे नियोजन सोप्पे व्हावे. त्यांनी रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा म्हणून हा बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
रेल्वे मध्ये एआय?
भारतीय रेल्वेसेवा आता आपल्या कार्यशैलीमध्ये वेगाने बदल करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणजे रेल्वे मध्ये एआय तंत्राचा वापर. रेल्वे तिकीट आरक्षण व्यवस्थेमध्ये एआय तंत्राचा वापर केल्यामुळे कॅनर्फ्म टिकीटांमध्ये ३० टक्क्यांमध्ये वाढ झाल्याचे निर्दशनात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. आरक्षण व्यवस्थेते सोबतच, रेल्वेने किचनमध्ये एआय कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांकडून किचन स्वच्छतेवर लक्ष्य ठेवण्यात येईल.