"चून चून के मारुंगा!" म्हणतात ते असं, इस्त्रायलनं जारी केली हमासच्या दहशदवाद्यांना कंठस्नान घातलं ती यादी

18 Oct 2024 18:25:18

israel leader
 
 
तेल अवीव : इस्रायलवर हल्ला करणाऱ्या याह्या सिनवार या हमासच्या प्रमुखाचा १७ ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या लष्कराने खात्मा केला. गाझा पट्टीतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही ताजी घटना. या आधी हमास, हिजबुल्लाह या संघटनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या खात्मा मोसाद आणि इस्रायलच्या सुरक्षा दलाकडून करण्यात आला.

१. याह्या सिनवार - इस्रायली सैन्याने गाझामध्ये हमासचा नेता याह्या सिनवार याचा खातमा केला. इस्रायलशी असलेल्या तीव्र वैमानस्यातून अनेक कारवाया केल्या होत्या.

२. सालेह अल-अरौरी - हमासच्या संस्थापकांपैकी एक असेलेला ह्या नेत्याचा जानेवारी २०२४ मध्ये हवाई हल्ल्यात खात्मा करण्यात आला. वेस्ट बँकच्या परिसारात हमासचे लष्करी आणि आर्थिक व्यव्हार सांभाळण्याचे काम अरौरी करत होता.

३. मारवान इसा - मार्च मध्ये हमासच्या या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. मारवानवर झालेल्या हल्ल्यानंतर हमासची त्रेधा उडाली होता. पुढचे अनेक दिवस हमासचे नेते इस्रायलच्या भीतीपोटी लपून बसले होते.

४. मोहम्मद डेफ - सिनवार याचा निकटवर्तीय याला देखील कंठस्नान घालण्यात यश आले. १९९०च्या दशकात मोहम्मद डेफ याने सुसाईड बॉमबींगचा धडाका लावला होता, ज्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता.

५. फुआद शुक्र - हिजबुल्लाहचा फुआद शुक्र याला देखील इस्रायलच्या लष्कराने असाच धडा शिकवला. शुक्र याने हिजबुल्लाची लष्करी ताकत वाढवण्यासाठी प्रयत्न केला होता.

६. इस्माईल हनीयेह - हमासचा इस्माईल हनीयेह याचा देखील शेवट तेहरान मध्ये झाला, जेव्हा तो इराणच्या नव्या राष्ट्रध्यक्षांची भेट घेणार होता.

७. फतह शरीफ - फतह शरीफ हा असाच एक हमासच्या नेत्यांपैकी एक, ज्याचा खात्मा लेबनॉन मध्ये करण्यात आला.

८. अली कराकी - अली कराकी हा दहशतवादी एका बंकर मध्ये आपल्या साथीदारांसोबत, लपून बसला होता. इस्रायलने हवाई हल्ल्यात त्याला संपवले.

९. नबील कौक - नबील कौक याला सुद्धा अशाच एका हवाई हल्ल्यात संपवण्यात यश आले. हिजबुल्लाहच्या नेतृतवपदी नबील विराजमान होणार होता, त्या आधीच इस्रायलने त्याला धडा शिकवला.

१०. मोहम्मद सरूर - मोहम्मद सरूर हा हिजबुल्लाहच्या ड्रोन युनिटचे प्रमुख होता, त्याच्या नेतृत्वात या दहशतवादी संघटनांनी पहिल्यांदाच, इस्रायलच्या सुरक्षाव्यव्सथेला आधुनिक हत्यारांनी लक्ष्य केले होते. हवाई हल्ल्यात सरुर याचा शेवट झाला.

११. इब्राहिम कुबैसी - इब्राहिम कुबैसी हा हिजबुल्लाहाच्या मिसाईल युनिटचा विभाग प्रमुख होता. कुबैसी याने नियोजनबद्ध पद्धतीने इस्रायलच्या सैनिकांवर हल्ला केला होता.

१२. इब्राहिम अकील - इब्राहिम अकील या दहशतवाद्यावर ७० लाखाचा इनाम लावण्यात आले होते. अमेरीकेच्या दूतावासावर हल्ला करत त्याने ३०० निष्पाप जीवांचा बळी घेतला होता. इस्रायलच्या हातून अखेर त्याचा शेवट झाला.

१३. अहमद महमूद वहबी - अहमद महमूद वहबी जो राडवानचे लष्करी विभाग सांभाळात होता, त्याला इस्रायलने हवाई हल्ल्यात ठार केले.

१४. मोहम्मद नासेर - मोहम्मद नासेर हा हिजबुल्लाहचा वरिष्ठ अधिकारी होता. जो लेबनॉन मधून इस्रायलविरोधी कारवायांमध्ये सक्रीय होता.

१५. तालेब अब्दुल्ला - नासेर सोबत काम करणारा अब्दुल्ला हा देखील लेबनॉन मधून कार्यरत होता, इस्रायलने हवाई हल्ल्यात त्याचा खातमा केला.

१६. हसन नसराल्ला - ३ दशकांहून अधिक काळ, हिजबुल्लाहचे नेतृत्व करणाऱ्या हसन नसराल्लाहचा सप्टेंबर मध्ये खात्मा करण्यात आला. स्वता:च्या चाहत्यांचा वर्ग तयार करुन, जगाच्या पाठीवर विखारी द्वेष पसरवाणारा नसराल्लाह इस्रायलच्या भूमीवर थेट सैन्याद्वारे आक्रमाणाच्या तयारीत होता.

इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षाला आता वर्षपूर्ती झाली असून, हमास, इराण आणि हिजबुल्लाह या तिन्ही आघाड्यांवर इस्रायलला दहशतवादाच्या विरोधात संघर्ष करावा लागतो आहे.


 
Powered By Sangraha 9.0