ह्याया सिनवारच्या मृत्यूनंतर हमासचा प्रमुख कोण?

18 Oct 2024 17:51:12

Yahya Sinwar Death
 
नवी दिल्ली : इस्त्रायल आणि हमासच्या नव्या प्रमुखाचीही हत्या केली. हमासच्या प्रमुखाचे नाव हे याह्या सिनवार 
(Yahya Sinwar Death) होते. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्याचा तो एका मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच हल्ल्यात १२०० निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला तर २ हजारहून अधिक जण या हल्ल्यात जखमी झाले होते.
 
याह्या सिनवारला मारल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, आम्ही ७ ऑक्टोबर रोजीचा स्केअर सेट केला होता. पण युद्ध अद्यापही संपलेले नाही. सिनवार यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेने प्रतिक्रिया व्यक्त केली होती. राष्ट्राध्यक्ष बिडेन म्हणाले की, हमासचे नेते म्हणून हजारो इस्त्रायसल, अमेरिका, पॅलिस्टिनी आणि ३० हून अधिक देशातील नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असल्याची माहिती आहे.
 
जुलैमध्ये तेहनरान येथे हमासचा प्रमुख इस्माइल हनियाची हत्या करण्यात आली होती. यानंतर याह्या सिनवारची हमासने प्रमुख म्हणून निवड केली. मात्र आता इस्त्रायलने त्याच दहशतवाद्यांना हिटलर असे म्हटले आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयडीएफने याप्रकरणात म्हटले की, त्यांच्यावर लावण्यात आलेले बंधन, नियमावली परत मागे घेता येणार नाही.
 

 
खालेद मशाल, खलिल अल हय्या, महम्मूद अल जहार, मोहम्मद सिनवार, मुझा अबू यांचे नाव आगामी हमासच्या दहशतवादी संघटनेची धुरा सांभाळतील अशी शक्यता आहे. मात्र यामध्ये मोहम्मद सिनवार हा मृत याह्या सिनवारचा भाऊ असून त्याला संधी दिली जाईल असे बोलले जात आहे.
कोण आहेत याह्या सिनवार?
 
याह्या सिनवार हा १९८८ ते २०११ अशी २२ वर्षे तुरूंगात होता. सुटकेनंतर आता तो गाझापट्टीत कारवाया करणाऱ्या हमासच्या दहशतवादी संघटनेत सामील झाला. २०१७ साली त्याच्याकडे हमासची सूत्रं सोपवण्यात आली. यावेळी इस्त्रायल येथे क्रुरपणे पॅलेस्टाईन नागरिकांचं हत्याकांड करणाऱ्या याह्या सिनवारला कसाई म्हटलं जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0