इफ्फी गोवा विभागासाठी प्रवेशिका मागविण्यास सुरुवात
18-Oct-2024
Total Views | 15
गोवा : राज्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया) गोवा विभागासाठी प्रवेशिका मागविण्यास सुरुवात झाली आहे. गोवा मनोरंजन संस्थे (ईएसजी) तर्फे तशी सूचना जारी करण्यात आली आहे. गोव्यातील चित्रपटकर्मींना त्यांच्या फीचर आणि नॉन-फीचर चित्रपट या महोत्सवासाठी पाठवता येणार आहेत. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर आहे. फीचर चित्रपट मराठी किंवा कोंकणी भाषेत आणि नॉन-फीचर चित्रपट मराठी, कोंकणी, इंग्लिश आणि हिंदी भाषेत असणे आवश्यक आहे. या संबंधित अधिक माहिती गोवा मनोरंजन संस्थेच्या (ईएसजी) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.