परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी तुषार पवार व बापू भेगडे यांची निवड

16 Oct 2024 17:22:41

NCP
 
मुंबई : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशिष दामले तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी तुषार पवार व बापू भेगडे यांची निवड करण्यात आली असून या पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले आहे.
 
परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णय (नियोजन विभाग) कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ८ मधील तरतुदीनुसार करण्यात आली होती. यानुसार दि. १६ ऑक्टोबर रोजी आशिष दामले यांची निवड करण्यात आली तर तुषार पवार आणि बापू भेगडे यांची महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील कलम १२ (२)(ब)मधील तरतुदीनुसार संदर्भ क्र. १ अन्वये ही निवड करण्यात आली आहे. दरम्यान महामंडळावर निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0