आमदार विक्रम काळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट!

16 Oct 2024 11:41:57

Jarange 
 
जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विद्यमान आमदार विक्रम काळे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीमागचं कारण काय आणि यावेळी त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आलेली नाही.
 
मनोज जरांगेंनी आचारसंहितेनंतर निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. पंरतू, अद्याप त्यांनी याबाबत कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. अशातच मंगळवारी मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली असून त्यांच्यात दोन तास चर्चा झाली. त्यानंतर आता अजित पवारांचे आमदार विक्रम काळे यांनीसुद्धा जरांगेंची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0