नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूकांचे बिगुल वाजले असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष निवडणूकांच्या रिंगणात दंड थोपटून कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका एकाच टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रीया पार पडणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निवडणूकांचे निकाल जाहीर होणार आहेत. २२ ऑक्टोबर पासून उमेदवारांना आपल्या उमेदवारीचे अर्ज दाखल करता येणार आहेत. तर, २९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्याच सोबत, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे.
महाराष्ट्रामध्ये एकूण २८८ जागांसाठी लढत होणार असून, ९.६३ कोटी मतदात्यांच्या हातात महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे आणि विरोधाकांचे भविष्य आहे.