मुंबई : (Atul londhe)आरक्षणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खोटा व्हिडिओ चॅनलवर दाखवणे काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना भोवले आहे. लोंढे यांच्याविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खोटा व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी भाजपचे कार्यकर्ते रुपेश मालुसरे यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर लोंढेंविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.