नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले. यानंतर या हत्येप्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी संबंध असल्याची माहिती आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानबाबत एक पोस्ट शेअर केली होती. सलमान खानने केलेल्या काळवीटाच्या हत्येप्रकरणी माफी मागावी असा सल्ला त्यांनी दिला.
मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणात चारजण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. ते लॉरेन्स बिश्नोई टोळीचे असल्याची माहिती आहे. याप्रकरणात आता भाजपचे वरिष्ठ नेते हरनाथ सिंह यादव यांनी त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट शेअर केली.
हरनाथ सिंह यादव यांची पोस्ट
ते म्हणाले की, प्रिय सलमान खान, ज्या काळविटाला बिश्नोई समाज देवता म्हणून मानतो. त्या भावनांचा आदर न केल्याने त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात खूप दिवसांपासून तुमच्याबद्दल नाराजी असून तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असे ट्विट केले.