मुंबई : (Baba Siddique) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर दि.१३ ऑक्टोबर रोजी रात्री गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. मृत घोषित केल्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या 'एक्स' या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. २००४ ते २००८ या काळात बाबा सिद्दीकी यांनी विविध खात्यांचे राज्यमंत्री व म्हाडाचे अध्यक्ष म्हणून कार्य केल्याचे देखील त्यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये म्हटले आहे.