
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. रात्री ९:३० वाजताच्या सुमारास झीशान सिद्दीकी यांच्या कार्यलयाबाहेर ही धक्कादायक घटना घडली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
समाजमाध्यमांवर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली असल्याचे सांगतिले जात आहे. बिश्नोई गँगमधील एका सदस्याने ही पोस्ट शेअर केली असून, या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोई याने घेतली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी या पोस्टकर्त्याचा तपास केला असता, शुभम रामेश्वर लोणकर या इसमाचे नाव पुढे आले आहे. पोस्ट लिहीणारा शुभम पुण्याचा असून बिश्नोई गँगसोबत त्याचे संबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या पूर्वी देखील शुभम लोणकर याला अकोला इथुन अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. शुभम लोणकर हा २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांमध्ये लॉरेन्स बिश्नोई याच्यासोबत whatsapp व्हिडिओ कॉल वर संपर्कात होता.
बाबा सिद्दीकी हे नाव राजकारणापासून ते बॉलीवूड चित्रपटसृष्टी पर्यंत कायमच चर्चेचे राहीले आहे. सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त, या सारख्य दिग्गज कलाकारांसहीत त्यांच्या भेटीगाठी होत असत. त्यांच्या मृत्यूमुळे दिग्गज कलाकार, राजकारणी यांच्याकडून शोक व्यक्त केला जातो आहे.