इराणवर सायबर हल्ला! इस्रायल इराण संघर्षाला नवे वळण

12 Oct 2024 18:20:21

iran israel
 
तेहरान : इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता नवीन वळण घेतले आहे. शनिवारी इराणच्या सरकारी आस्थापनांवर आणि आण्विक केंद्रांवर इस्रायलने सायबार हल्ला केला आहे. १ ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर २०० क्षेपणास्त्र डागले. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनी या हल्ल्यानंतर प्रतिक्रीया दिली की इस्रायाल यावर तोडीस तोड उत्तर देईल. या पार्श्वभूमीवर हा हल्ला इस्रायल इराण संघर्षाला कलाटणी देणारा आहे.

इराण सरकारच्या तिन्ही शाखा - न्यायपालिका, कायदेमंडळ आणि कार्यकारी विभाग यांना मोठ्या प्रमाणात सायबर हल्ल्यांचा फटका बसला आहे. त्याच सोबत, या विभागातली गुप्त माहिती सुद्धा चोरीला गेली आहे. इराण सरकारच्या प्रतिनीधीने म्हटले की, आमच्या आण्विक सुविधांना सायबर हल्ल्यांद्वारे लक्ष्य केले गेले आहे, त्याच सोबत, इंधन वितरण, नगरपालिका नेटवर्क, वाहतूक नेटवर्क, बंदरे आणि तत्सम क्षेत्रांसारखे नेटवर्क यामुळे प्रभावित झाले आहेत. संपूर्ण इराण देश या हल्ल्यामुळे गर्भगळीत झाल्याचे म्हटले जात आहे.

अमेरीकेकडून इराणवर निर्बंध.
इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यामुळे अमेरीकेने इराणच्या व्यापारावर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरीकेच्या स्टेट डिपार्टमेंटने म्हटले की जो बायडेन यांच्या प्रशसानाने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमी वर इराणवर कठोर निर्बंध लावण्यात येत आहे. इराणची राजवट, तिथे सुरु असलेला आण्विक कार्यक्रम आणि क्षेपणास्त्रांचा विकास या सोबत,दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे या सर्व गोष्टींना लगाम घालण्यासाठी आज ही कठोर पावले उचलले जात आहेत. इराणच्या या अतिरेकी हल्ल्यामुळे इराणने नामुष्की ओढावून घेतली होतीच. पण, इस्रायलने दिलेल्या प्रतिउत्तरामुळे इराणला पळता भुई थोडी झाली आहे.



 
Powered By Sangraha 9.0