नवी दिल्ली : विदेशात राहून भारताला आव्हान देण्याचे प्रयत्न काही जणांकडून होत आहेत. खलिस्तानी संघटना सिख फॉर जस्टिसचा अतिरेकी गुरपतवंत सिंह पन्नून याने भारताविरोधात गरळ ओकली आहे. पन्नूनने एक व्हिडिओ शेअऱ करत त्यात देशातील काही राज्य भारतापासून दुभंगली जावी यासाठी मोहिम करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी चीनला भारतावर आक्रमण करण्याचा सल्ला दिला आहे.
शिख फॉर जस्टिस ही संघटना पंजाबला भारतापासून वेगळे करून खालिस्तानची स्वतंत्र देश म्हणून निर्मातीची मागणी करत आहेत. संघटनेच्या मागणीला पंजाब येथून कोणीच समर्थन दिले नाही. गुरूपवंत सिंह पन्नून हे अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये राहतो. त्याने आपल्या व्हिडिओत जम्मू-काश्मीर, आसाम, मणिपूर आणि नागालँड या स्वतंत्र्यासाठी आंदोलन करणार असे सांगितले.
खलिस्तानी अतिरेकी पन्नूनने आपल्या व्हिडिओमध्ये चीनने भारतावर हल्ला करण्याचा सल्ला दिली आहे. तो राष्ट्रपती शी जिनपिंग यांना म्हणाला की, चीनने आपल्या लष्करांसह अरूणाचल प्रदेशावर आक्रमण करण्याचे आदेश द्यावे. अरूणाचल हा चीनचा भाग आहे. माझे भारताला आव्हन देण्याचे काम सुरूच आहे.