मुंबई-पुणे प्रवासाला गती मिळणार

12 Oct 2024 17:38:19

thane


 मुंबई दि. १२ : प्रतिनिधी 
सायन -पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल क्र.३च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस ( रायगड ) ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांच्या कामाचे भूमिपूजन रविवार, दि १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.

वाशी खाडी पुलावरील वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ७७५ कोटी खर्चाच्या तिसऱ्या वाशी खाडीपुलाचे काम सुरु केले. मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठीचा तीन लेनचा खाडीपुल दृष्टीक्षेपात असून याचे काम वेगाने सुरु आहे. आज रविवार दि.१३ रोजी या पुलाची मुंबईहुन पुण्याच्या दिशेने जाणार्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.


या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्य अतिथी तर सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ), मंत्री दादाजी भुसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटनानंतर ठाणे खाडी पुलाची मुंबईहून पुण्याला जाणारी उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी सोमवार, दि. १४ ऑक्टोबर पासून नागरिकांसाठी सुरु होईल.

लोकार्पण होणाऱ्या प्रकल्पांची माहिती 

सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल क्र.३ अंतर्गत प्रत्येकी 3 मार्गिकांचे 2 पुल बांधणे प्रस्तावित होते. यापैकी मुंबईहुन पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनीचे काम पूर्ण झाले आहे व पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 559 कोटी असून याची लांबी पोच रस्त्यांसह ३१८० मी. आहे. सद्यास्थितीत उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण करुन ती वाहतुकीसाठी खुली करण्यात येत आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणा-या दक्षिण वाहिनीचे काम ८० % पूर्ण झाले आहे.

कोकणातील प्रकल्पांचे भूमिपूजन 

रेवस ते रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्ग प्रकल्पाची एकूण लांबी ४९८ किमी. इतकी आहे. हा महामार्ग पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा असून कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनाऱ्यांना कॉलिफोर्नियाच्या धर्तीवर गतिमान महामार्गाने जोडणारा हा प्रकल्प आहे. या सागरी महामार्गावरील पुढील सात पुलांचे भूमिपूजन होत आहे. सर्व ७ पुलांची एकूण लांबी २६.७० किमी आणि एकूण प्रशासकीय मान्यता रु. ७८५१ कोटी इतकी आहे.

1) रेवस- कांरजा भागातील धरमतर खाडी पुल

 एकूण लांबी : 10.20 किमी.
 प्रशासकीय मान्यता : रु. 3057 कोटी
 पुलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पुल)
 कामाची मुदत : 3 वर्ष

2) रेवदांडा- साळाव भागातील कुंडलिका खाडी पुल

 एकूण लांबी : 3.82 कि मी
 प्रशासकीय मान्यता रक्कम : 1736 कोटी
 पुलाचा प्रकार : केबल स्टे
 कामाची मुदत : 3 वर्ष

3) दिघी आगरदांडा भागातील आगरदांडा खाडी पुल

 एकूण लांबी : 4.31 किमी.
 प्रशासकीय मान्य रक्कम : 1315 कोटी.
 पुलाचा प्रकार : केबल स्टे
 कामाची मुदत : 3 वर्ष

4) बागमांडला वेश्वी भागातील बाणकोट खाडी पुल 

 एकूण लांबी : 1.711 किमी.
 प्रशासकीय मान्य रक्कम : रु. 408 कोटी
 पुलाचा प्रकार : केबल स्टे
 कामाची मुदत : 3 वर्ष

5) केळशी भागातील केळशी खाडी पुल 

 एकूण लांबी : 670 मी.
 प्रशासकीय मान्य रक्कम : रु. १४८ कोटी
 पुलाचा प्रकार: बॉक्स गर्डर
 कामाची मुदत : ३ वर्ष

6) जयगड खाडीवरील पुल

 एकूण लांबी : ४.४० किमी.
 प्रशासकीय मान्य रक्कम : रु. ९३० कोटी
 पुलाचा प्रकार : केबल स्टेड
 कामाची मुदत : ३ वर्ष

7) कुणकेश्वर येथील पुलाचे बांधकाम

 एकूण लांबी : १५८० मी.
 प्रशासकीय मान्य रक्कम : रु. २५७ कोटी
 पुलाचा प्रकार : केबल स्टेड
Powered By Sangraha 9.0