दसरा मेळाव्यासाठी उबाठा गटाचं टीझर जारी!

11 Oct 2024 13:08:40
 
UBT
 
मुंबई : दसरा मेळाव्यानिमित्त उबाठा गटाने दुसरे टीझर जारी केले आहे. दरवर्षीप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्कमध्ये उबाठा गटाचा दसरा मेळावा होणार आहे. दरम्यान, त्यासाठीची तयारी सुरु करण्यात आली आहे. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत.
 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाने उबाठा गटाने जारी केलेल्या टीझरची सुरुवात झाली आहे. "दिल्लीश्वरांचा महाराष्ट्रद्वेष ठेचण्यासाठी, गद्दार वृत्ती गाडण्यासाठी, महाराष्ट्राला लागलेला कलंक पुसण्यासाठी, महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा खरपूस समाचार घेण्यासाठी महाराष्ट्राचा एकमेव पारंपारिक दसरा मेळावा," असे या टीझरमध्ये म्हटले आहे. त्यानंतर शेवटी उद्धव ठाकरेंच्या सभेच्या फोटोने या टीझरचा शेवट करण्यात आला.
 
हे वाचलंत का? -  सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात सर्वात पुढे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचे दोन वेगवेगळे मेळावे होतात. यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्कमध्ये उबाठा गटाचा तर आझाद मैदनात एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा पार पडणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0