कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं! संजय राऊतांवर भाजपची टीका

11 Oct 2024 17:51:38
 
Raut
 
मुंबई : कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर केली आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर संजय राऊतांनी टीका केली होती. दरम्यान, आता केशव उपाध्येंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे. मदरशांना निधी देऊन आणि शिक्षकांचा पगार वाढवून सरकारने व्होट जिहाद च केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, सरकारने फक्त गणित आणि विज्ञान शिकवणाऱ्या मदरशांना निधी दिला आहे. तसेच फक्त विज्ञान आणि गणित शिकवणाऱ्या शिक्षकांचा पगार वाढवला आहे."
 
हे वाचलंत का? -  लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
 
"मदरशांमध्ये पारंपारिक जिहादी शिक्षण देणाऱ्या शाळा आणि शिक्षकांना यामध्ये काही मिळणार नाही. आणि राहता राहिला प्रश्न व्होट जिहादचा, तो कसा करतात हे सगळ्यांपेक्षा जास्त राऊतजी तुम्हालाच माहिती आहे. तसा अनुभवही तुम्हालाच आहे," असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
 
 
Powered By Sangraha 9.0