
नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्घाला ७ ऑक्टोबर रोजी १ वर्ष पूर्ण झाले. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासने इस्रायलवर हल्ला करण्याची योजना आखली आणि नरसंहार करायाला सुरुवात केला. हमासच्या रॉकेट हल्ल्यात एकाच वेळी १२०० जणं मृत्यूमुखी पडले. या सोबत, हमासने २०० जणांना ओलीस ठेवले. यातील काही जणांचा हमासने खून केला असून आज सुद्धा यातील काही जणं हमासच्या ताब्यात आहेत.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धामध्ये आजपर्यंत ४२ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात जवळपास १६ हजार बालकांचा समावेश आहे. युद्दामुळे १ लाखांहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जवळपास १० हजार लोक बेपत्ता झाले आहे. या संघर्षामुळे गाझा पट्टीतल्या पायाभूत सुविधांचे सुद्धा आतोनात नुकसान झाल्याची माहीती मिळाली आहे. गाझा पट्टीत अधर्यांहून अधिक घरं बेचिराख झाली आहेत. ३६ पैकी केवळ १७ हॉस्पीटल्स सुरु आहेत. युद्ध सुरु झाल्यापासून १०० पेक्षा जास्त पॅलेस्टाईनी पत्रकारांचा मृत्यू झाल आहे.
हमासने आपल्या दहशतवादी कारवायांना सुरु ठेवण्यासाठी ह्लमन शिल्ड म्हणून सामान्य नागरिकांचा वापर केला. अमानुष कत्तली आणि दहशतवादाचा प्रसार करत, युद्ध सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हमासच्या नेतृत्वाने इस्रायलच्या भूमीवर थेट हल्ला करण्याची योजना आखल्यामुळे इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणनेकडून थेट या नेतृत्वालाच लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये हसन नसराल्लाह, इस्माईल हनीयेह, मोहम्मद देईफ यांचा खात्मा करण्यात आला. जागतिक राजकारणाच्या पटलावर अद्याप तरी अमेरीका आणि युरोपीय देशांना इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले नाही. संयुक्त राष्ट्रासारखी बलाढ्य संघटना अस्तित्वात असून सुद्धा अशा प्रकारे युद्ध होत असेल तर या संघटनेचा उपयोग काय ? असे म्हणत संघटनेच्या कामावर टिका केली जात आहे. आताच्या घडीला गाझा मध्ये दुष्काळ पडला आहे. लाखो लोकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. वैद्यकीय सुविधांचा तुटवडा पडला आहे. लाखो लोक आजच्या तारखेला ही युद्धाची काळरात्र सरण्याची वाट बघत आहेत.