इमाम जुल्फिकार खान हा मुळचा पाकिस्तानी. १९९५ साली तो इटलीत आला. इथे निवांत आसरा मिळाल्यावर त्याने धर्मांध दहशतवादी समर्थन आणि कारवाया सुरू केल्या. मात्र, दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी इटली सरकारने त्याची देशाबाहेर हकालपट्टी करणार्या आदेशाला मंजुरी दिली आहे.
इमाम जुल्फिकार खान हा मुळचा पाकिस्तानी. १९९५ साली तो इटलीत आला. इथे निवांत आसरा मिळाल्यावर त्याने धर्मांध दहशतवादी समर्थन आणि कारवाया सुरू केल्या. मात्र, दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी इटली सरकारने त्याची देशाबाहेर हकालपट्टी करणार्या आदेशाला मंजुरी दिली आहे.
हा जुल्फिकार राहायचा इटलीत, सगळ्या सुखसुविधा भोगायचा इटलीत. मात्र, त्याला काळजी दहशतवादी संघटन ‘हमास’ची. इटलीमधल्या प्रमुख मशिदीमधून त्याने मुसलमानांना ‘हमास’च्या समर्थनासाठी आवाहन केले होते. त्याचे म्हणणे ‘हमास’ ही संघटना दहशतवादी नाही, तर ‘हमास’ हे त्यांच्या जमिनीचे रक्षक आहेत. उलट अमेरिका आणि इस्रायल हे दहशतवादी आणि हत्यारे आहेत. तसेच, इस्रायल आणि ज्यूविरोधात त्याने देशातील मुस्लिमांना भडकवायला सुरूवात केली होती. इतकेच नव्हे, तर इटलीतील ख्रिश्चनांनाही त्याने आवाहन केले होते की, ज्यू काही मुस्लिमांच्या विरोधातच नाहीत, तर बायबलच्या सुसमाचारमध्येही ज्यू यांनी विरोधच केला आहे.
थोडक्यात, या जुल्फिकारला इटलीतील तीन टक्के मुसलमानांना आणि बहुसंख्य ख्रिश्चनांना ज्यू विरोधात भडकवायचे होते. मात्र, इटलीमधले ख्रिश्चन हे आधीच देशात आश्रयाला आलेल्या शरणार्थी मुसलमानांच्या विरोधात असल्याने जुल्फिकारच्या बोलण्याला इटलीतील ख्रिश्चनांनी अजिबात समर्थन दिले नाही. मात्र, इटलीतील मुस्लीम जुल्फिकारच्या आवाहानाने एकवटला.
देशातील मुसमलानांना हा जुल्फिकार चिथावू लागला की, इटली सरकारला मुसलमांनानी अजिबात कर देऊ नये. उलट ते पैसे
देशातील मुस्लीम समाजासाठी खर्च करावेत. इटलीतील कायदा-सुव्यवस्था वगैरे देशातील मुसलमानांसाठी आहे का? तर जुल्फिकारचे मत आहे की, इटलीमधील प्रथा, आधुनिक चलनवलन मुस्लिमांना आवडल्या नाहीत, तर मुसलमानांनी कायदा हातात घ्यावा. त्यानुसार त्याने इटलीतील मुसलमानांना आदेश दिला की, समलैंगिकता हा भयंकर गुन्हा असून अशी प्रकरण आढळल्यास त्यांचा खून करणे, हे आपले कर्तव्य आहे, तर असा हा जुल्फिकार समाजमाध्यमांवर म्हणाला की, “अमेरिका, इटली, जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटेन या देशांचा नाश व्हावा म्हणून मी अल्लाकडे प्रार्थना करतो.” इटलीमध्ये राहून इटलीच्याच
विनाशाची बरबादीची प्रार्थना हा जुल्फिकार उघडउघड करतो, म्हणून इटलीच्या सरकारने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, त्यापाठी आणखी एक कारण होते ते म्हणजे इटलीच्या सुरक्षा यंत्रणेचे म्हणणे आहे की, “हा जुल्फिकार देशात अराजकता माजावी, दंगली घडाव्यात म्हणून विखारी वक्तव्य करतोच, पण त्याचबरोबर ‘हमास’ - ‘हिजबुल्ला’ सारख्या दहशतवादी संघटनांना इटलीच्या बोलोग्ना परिसरात प्रवेश मिळावा, त्याद्वारे इटलीमध्येही दहशतवादी संघटनांचा नंगानाच सुरू व्हावा, यासाठी हा जुल्फिकार प्रयत्नशील होता.पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया तसेच, आफ्रिका खंडातील अनेक मुस्लीम देशातील मुस्लीम नागरिक चांगल्या रोजगारासाठी, जिवाच्या सुरक्षिततेसाठी, सुखासाठी त्यांचा देश सोडून दुसर्या देशात शरणार्थी किंवा नागरिक म्हणून जगण्याचा निर्णय घेतात. त्यासाठी कायद्याचा कमी आणि षड्यंत्राचा वापर अर्थात जास्त केला जातो. तसेच, या लोकांची पहिली पसंती असते युरोपीय राष्ट्रे. पण, विशेष म्हणजे हे सगळे मुस्लीम देशातील मुस्लीम लोक त्यांच्या देशाला तिथल्या वातावरणाला कंटाळून युरोपात किंवा इतर देशात जातात. मात्र, युरोपात किंवा इतर देशात आसरा मिळाला की, हे लोक त्या देशात पुन्हा त्यांच्या मूळ मुस्लीम देशासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा आटापिटा करतात. या समस्यांनी ग्रस्त असलेल्या देशांनी त्यांच्या त्यांच्या परीने कायदे बनवायला सुरूवात केली आहे.
इटलीही याला अपवाद नाही. इटलीमध्ये जगभरातल्या १४ धर्मांना कायद्याने मान्यता आहे. मात्र, यामध्ये इस्लामला समाविष्ट केले नाही. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी तर म्हटले होते की, युरोपीय संस्कृती आणि मुस्लीम संस्कृती यांच्यात विरोधाभास आहे. त्यामुळे मुस्लिमांनी युरोपपासून दूर राहावे. इटलीमध्ये मशिदी आणि मशिदींना होणारे फंडिंग, कट्टरतावादी धर्मांध प्रशिक्षण यासाठी कडक कायदे निर्माण केले. देशाच्या सुरक्षिततेसाठी खंबीर पावले उचलली. त्यामुळेच इटलीमधून इमाम जुल्फिकारची हकालपट्टी झाली. इटलीच्या निर्णयाचे जगभरातून स्वागत होत आहे.