जीएसटी संकलनात ६.५ टक्के वाढ; केंद्राच्या तिजोरीत १.७३ लाख कोटी जमा!

    01-Oct-2024
Total Views |
gst-collection-increased-in-september-government


मुंबई :     केंद्राच्या जीएसटी संकलनात वाढ झाली असून सप्टेंबर महिन्यात ६.५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सरकारच्या तिजोरीत १.७३ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले. गेल्या वर्षी याच कालावधीत जीएसटी संकलनात १.६३ लाख कोटी रुपये होते. निव्वळ जीएसटी संकलन ३.९ टक्क्यांनी वाढले आहे.


हे वाचलंत का? -     'बँक ऑफ बडोदा'तर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ २०२४ उपक्रम; बीएमसी कर्मचाऱ्यांचा सत्कार


दरम्यान, निव्वळ जीएसटी संकलन ३.९ टक्क्यांनी वाढले असून मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सप्टेंबर २०२४ मध्ये १.५३ लाख कोटी रुपये झाले आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये २०,४५८ कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला. हा परतावा यंदा ३१% अधिक असून ऑगस्ट महिन्यात ३८ टक्के वाढीसह २४,४६० कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे.

जीएसटी संकलन वाढीबरोबरच आता देशांतर्गत महसूलदेखील वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत महसूल ५.९ टक्क्यांनी वाढून सुमारे १,२७,८५० कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत देशांतर्गत महसूल १ लाख २० हजार ६८६ कोटी इतका होता. तसेच, यंदा ९.२ टक्के वाढीसह सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली होती.