मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने संघटनात्मक बदलांना सुरुवात केली असून, दीपक दळवी यांची उत्तर पूर्व मुंबईच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी त्यांना नियुक्तीपत्र दिले. दळवी हे याआधी भाजप उत्तर पूर्व मुंबईचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.