बजाज ऑटोची रेकॉर्डब्रेक वाहनविक्री; २० टक्के वाढीसह ४.६९ लाख वाहनांची विक्री!

    01-Oct-2024
Total Views |
bajaj-auto-sold-vehicles-sales-increased


मुंबई :     वाहननिर्मिती क्षेत्रातील अग्रणी कंपनी बजाज ऑटोने सप्टेंबर महिन्यात विक्रमी वाहनविक्री केली आहे. बजाज ऑटोच्या वाहनांची विक्री सप्टेंबरमध्ये २० टक्क्यांनी वाढून ४ लाख ६९ हजार ५३१ युनिट्सवर गेली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ दिसून आली आहे.




दरम्यान, देशांतर्गत विक्री २३ टक्क्यांनी वाढून ३,११,८८७ वाहनांची विक्री झाली असून सप्टेंबर २०२३ मध्ये २,५३,१९३ वाहनांची विक्री झाली आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. निर्यातीत वार्षिक १३ टक्क्यांची वाढ होऊन ती १,५७,६४४ युनिट्सवर पोहोचली आहे. जी मागील वर्षीच्या याच महिन्यात विकल्या गेल्यापेक्षा २२ टक्के अधिक आहे.

कंपनीने सांगितले की, देशांतर्गत दुचाकींची विक्री २,५९,३३३ युनिट्स झाली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात २,०२,५१० युनिट्सपेक्षा २८ टक्के अधिक आहे. निर्यात १,४१,१५६ युनिट्स होती, जी सप्टेंबर २०२३ मध्ये १,२५,२०२ युनिट्सच्या तुलनेत वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत १३ टक्के जास्त दिसून आली.

गेल्या महिन्यात व्यावसायिक वाहनांची विक्री सहा टक्क्यांनी वाढून ६९,०४२ युनिट्सवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत ६४,८४६ युनिट्स होती. मागील महिन्यात २० टक्के वाढीसह ४.६९ लाख वाहनांची विक्री झाल्याचे बजाज ऑटोने जाहीर केले आहे.