आनंदराव अडसूळ यांनी स्वीकारला अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार

    01-Oct-2024
Total Views |

adsul
 
 
 मुंबई : माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवार, दि. १ ऑक्टोबर रोजी त्यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्षपदी धर्मपाल मेश्राम, गोरक्षक लोखंडे आणि वैदेही वाढाण यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्यांनीही आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.