नवरात्रीचे कपडे खरेदी करण्यासाठी दादरमध्ये गर्दी

01 Oct 2024 14:51:40

 

नवरात्र खरेदी

 

मुंबई : नवरात्रीला अवघे काहीच दिवस उरलेत त्यामुळे नवरात्रीच्या खरेदीला सुरुवात झालेली आहे. दादर बाजार हे मुंबईतील एक प्रसिद्ध खरेदीचे ठिकाण आहे. त्यामुळे दादरच्या बाजारातही नवरात्रीच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळत आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस गरबा, दांडिया खेळले जातात त्यावेळी खास पोशाख परिधान केला जातो त्यामुळे या पोषाखांची खरेदी दादरमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. महिला, पुरुष आणि लहानमुले अशा सगळ्यांसाठी नवरात्रीचे खास कपडे दादरच्या बाजारात उपलब्ध आहेत. नवरात्रीच्या दिवसांत महिला विशेष करून परिधान करतात ती म्हणजे घागरा- चोली. १००० रुपयांपासून ३००० हजार रुपयांपर्यंत या वर्षी दादरच्या बाजारात या घागरा-चोलींच्या किंमती आहेत. फक्त घागरा खरेदी करायचा असेल तर त्याच्या किंमती ५०० रुपयांपासून सुरू होतात. महिलांसाठी बांधणीच्या ओढण्याही बाजारात उपलब्ध आहेत. या ओढण्यांची किंमत १५० रुपये आहे. पुरुषांसाठी खास नवरात्रीमध्ये परिधान केले जाणारे जॅकेट्स आणि धोती दादरमध्ये उपलब्ध आहेत. या जॅकेट्स आणि धोतीची जोडीच्या किंमती ८०० ते २५०० च्या दरम्यान आहेत. या वर्षीचे खास आकर्षण म्हणजे महिला आणि पुरुष दोघेही घालू शकतील असे जॅकेट्स. या जॅकेट्सची किंमती ६०० ते १२०० च्या दरम्यान आहेत. लहान मुलांच्या नवरात्री विशेष कपड्यांच्या किंमती १००० पासून सुरू होत आहेत. लहानमुलांसाठी खास नवरात्री स्पेशल कापडी छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत. या छत्र्यांची किंमत ४०० ते ५०० रुपये आहे.
Powered By Sangraha 9.0