मुंबई : गेली १५-२० मुंबईत मेव्हेणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे असंच चाललं होत, त्यांच्यापासून मुंबई वाचवायची आहे, असा घणाघात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावर संजय राऊतांनी टीका केली होती.
केशव उपाध्ये म्हणाले की, "संजय राऊत आज पहिल्यांदा एक वाक्य खरे बोलले ते म्हणजे अमित शाह महाराष्ट्रात येणार म्हटल्यावर आम्हाला भिती वाटते. महाराष्ट्रातील षडयत्रांची त्यांना महिती मिळते. ही षडयंत्र यशस्वी होऊ नयेत म्हणून मोदीजी आणि अमित शाह यांना वारंवार महाराष्ट्रात यावे लागते. राहिला प्रश्न उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जाण्याचा तर आता सर्वांनाच समजून चुकलंय की, राज्यात कमिशन किंवा उद्योगात पार्टनरशीप मागणारे सरकार नाही. त्यामुळे उद्योगही येतात आहेत अन् त्यांची उभारणीही सुरू झाली आहे."
"मुंबई ही हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळाली असल्यानेच मुंबई कोणाच्या एकट्या परिवाराच्या नातलगांची होऊ नये यासाठी त्याचं संरक्षण करणे गृहमंत्र्यांचे कर्तव्य आहे. गेली पंधरा वीस वर्षे मुंबई महापालिकेत काय चालले होते मेव्हेणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे असंच चाललं होत. त्यांच्यापासून आता मुंबई वाचवायची आहे," असेही ते म्हणाले.र्ण पक्ष आता शरद पवार गटात दाखल होणार आहे.