नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील यंदाचे खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती भवनात औपचारिक समारंभात प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. क्रिकेटपटू मोहम्मद शामी आणि अॅथलेट पारूल चौधरी यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दरम्यान, बॅडमिंटन स्टार चिराग शेट्टी आणि रँकीरेड्डी सात्विक साई राज यांना खेलरत्न, तर विविध क्रीडा प्रकारातील अन्य २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आला. याचसोबतच क्रीडा प्रशिक्षकांसह लाईफ टाईम अचिव्हमेंट यांसारख्या पुरस्कारही मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले.