लखनौ : अयोध्येत २२ जानेवारीला राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. २४ जानेवारीपासुन राममंदिर सर्व भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यानंतर अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानिमित्ताने भाविकांसाठी सोयीसुविधा करण्याच काम सरकारकडून केले जात आहे.
उत्तरप्रदेश सरकारने भाविकांसाठी रामपथ आणि धर्मपथावर ईलेक्ट्रीक बस सेवा सुरु करण्याची योजना आखली आहे. १०० बस १५ जानेवारीपासुन अयोध्येमध्ये सुरु होणार आहेत. उद्घाटनानंतर लाखोंच्या संख्येने होणाऱ्या भाविकांच्या गर्दीला नियंत्रीत करण्याच्या दृष्टीने या बससेवा सुरु करण्यात आल्या आहेत. अयोध्येतील विकास कामे पर्यावरण पुरक करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या बस सुरु करण्यात आल्या आहेत.
अयोध्येत भाविकांच्या संख्येचा अंदाज घेऊन प्रवाशांसाठी आधूनिक सुविधा उभारल्या जात आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि अयोध्याधाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर अयोध्येत मंदिर परिसरात गोल्फ कार्ट आणि ई-रिक्षा सुद्धा सुरु केल्या जाणार असल्याच सांगण्यात आल आहे.