रेल्वेत अॅप्रेंटिसशीपसाठी मोठी संधी; १० वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

09 Jan 2024 12:45:46
RRC Jaipur Apprenticeship Recruitment 2024

मुंबई :
उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत नवी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात रेल्वेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अॅप्रेंटिसशीपसाठी येत्या दि. १० जानेवारीपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच, या अॅप्रेंटिसशीपकरिता इच्छुक उमेदवारांना अर्ज करावयाचा आहे.

पदाचे नाव –

शिकाऊ उमेदवार(अॅप्रेंटिसशीप) ६७२ जागा

शैक्षणिक पात्रता –

१० वी उत्तीर्ण तसेच शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.


वयोमर्यादा -

२४ वर्षे

अर्ज शुल्क -

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून १०० रुपये आकारले जाणार आहेत.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे.

अॅप्रेटिंसशीप करण्याचे ठिकाण - राजस्थान

अर्ज सादर करण्याकरिता अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून दि. १० फेब्रुवारी २०२४ पूर्वी अर्ज करणे आवश्यक.

जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

Powered By Sangraha 9.0