महेश जाधवांच्या आरोपानंतर मनसेने दिला दणका! मराठी कामगार सेनेची पक्षातून हकालपट्टी

09 Jan 2024 18:05:56

Raj Thackeray & Mahesh Jadhav


मुंबई :
मनसे पदाधिकारी आणि माथाडी कामगारांचे नेते महेश जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, आता 'मराठी कामगार सेना' या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
 
यापुढे मराठी कामगार सेना या संघटनेचा आणि त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी अथवा पक्षाची अंगिकृत संघटना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांच्याशी कोणताही संबंध राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मराठी कामगार सेनेच्या कोणत्याही भुमिकेशी, पदाधिकारी आणि सदस्यांशी मनसे या राजकीय पक्षाचा कोणताही संबंध नसेल, असेही या पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
 
अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला असून माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास राज ठाकरे आणि अमित ठाकरे जबाबदार असतील असा गंभीर आरोप केला आहे. तसेच मनसे पक्ष पक्ष फक्त आणि फक्त खंडणीखोर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी नवी मुंबईत माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. दरम्यान, महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करुन राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

Powered By Sangraha 9.0