भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत अॅप्रेंटिसशीपसाठी थेट मुलाखत; जाणून घ्या कुणाला करता येणार अर्ज!

09 Jan 2024 12:26:50
Bharat Electronics Limited Apprenticeship Recruitment

मुंबई :
 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'अंतर्गत नवी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात भारत इलेक्ट्रॉनिक्सकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अॅप्रेंटिसशीपसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दक्षिण प्रदेशातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

पुढील शाखेतील डिप्लोमा धारकांना ही अॅपेंटिसशीप करता येणार आहे.

कम्प्युटर सायन्स, लायब्ररी सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स इंजिनियरींग, कमर्शियल प्रॅक्टिस.

उमेदवारांना १ वर्षांसाठी अॅप्रेटिंसशीपकरिता करता येणार आहे.

तसेच, सदर अॅप्रेटिंसशीप करताना उमेदवारास महिना १२,५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे.
 
अॅप्रेटिंसशीप करण्याचे ठिकाण - बंगळुरू
 
वयोमर्यादा ही १८ ते २५ वर्षांपर्यंत असणार आहे.

मुलाखत दिनांक -

१८ जानेवारी २०२४, सकाळी १० वाजता.

मुलाखतीचे ठिकाण -

होंगीराणा, सेंटर फॉर लर्निंग अँड डेव्हलपमेंट (सीएलडी), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलाहल्ली पोस्ट, बेंगळुरू – ५६० ०१३.

जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

भरतीसंदर्भातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा
Powered By Sangraha 9.0