रामंदिरावर फडकणार ४४ फूट उंचीचा धर्मध्वज; मंदिर आणि ध्वजाची एकत्रीत उंची होणार २०५ फूट!

08 Jan 2024 19:14:36
dhwaj ram mandir
 
लखनौ : येत्या २२ जानेवारीला राममंदिरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्या सोहळ्याची भारतभर जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येत राम मंदिरावर १६१ फूट उंचीवर धर्मध्वज फडकवला जाणार आहे. मंदिराची उंची १६१ फूट इतकी आहे. त्यावर ४४ फूट उंच ध्वज फडकवला जाणार आहे.
 
मंदिर आणि ध्वजाची एकत्रीत उंची २०५ फूट होईल. हा ध्वज अयोध्येपासुन १३५० किमी दुर असलेल्या अहमदाबाद वरून आणला गेला आहे. २२ जानेवारीला विजय पताका च्या स्वरुपात पंतप्रधान नरेंद्र मोदी हा ध्वज फडकवतील. हा ध्वज अयोध्येत पोहोचला आहे. पण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापर्य़ंत हाध्वज कोठे ठेवला जाईल हे सांगण्यात आलेले नाही.
 
अहमदाबादच्या अंबिका इंजिनियर्स या कंपनीने हा धर्मध्वज तयार केला आहे. हा ध्वज बनवण्यासाठी ७ महीन्यांचा कालावधी लागला होता. ५ जानेवारीला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद येथून हा ध्वज अयोध्येकडे रवाना केला होता.  एका ट्रकमध्ये झेंडा घेऊन ५ जण ३ दिवसांत रामजन्मभूमीवर पोहोचले व ध्वज ट्रस्टच्या सदस्यांकडे तो सुपुर्द करण्यात आला.


Powered By Sangraha 9.0