श्रीरामजन्मभूमी मंदिरात रामलल्लांची मूर्ती होणार सुवर्ण सिंहासनावर विराजमान!

07 Jan 2024 19:43:22
ram mandir garbhagruh
 
लखनौ : अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी संपूर्ण भारतात उत्साहाच वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थीतीत हा सोहळा पार पडणार आहे. २४ जानेवारीपासुन सर्व भारतीयांसाठी मंदिर खूले केले जाणार आहे.
 
भव्य श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी कर्नाटकच्या अरुण योगिराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. ही मूर्ती सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होणार असल्याच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. रामलल्लांची मूर्ती ५१ इंच इतक्या उंचीची असेल. पाच वर्ष वय असलेल्या रामाच्या बालपणीचे स्वरुप दर्शवणारी ही मूर्ती असेल.
 
ही मूर्ती निळ्या रंगाची असणार आहे. व ती संगमरवरापासून बनलेल्या व सुवर्ण आणि रत्नांनी जडवलेल्या सिंहासनावर विराजमान होणार आहे. प्राणप्रतिष्ठा दिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करतील त्यानंतर रामलल्लांच्य मूर्तीचे नेत्र कवच हटवण्यात येतील त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीला पवित्र पाण्याने अभिषेक करण्यात येईल व श्रीराम सुवर्ण सिंहासनावर विराजमान होतील. सिंहासनावर अचल मूर्ती विराजमान होणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0