"वय झालं की थांबायचं असतं"; दादांचा काकांना पुन्हा एकदा सल्ला
07-Jan-2024
Total Views |
कल्याण : "८० वय झाले तरी काही जण रिटायर्ड होत नाहीत. वय झाले की थांबायचे असते पण काही जण अति करीत आहेत." अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना खोचक टोला मारला आहे. ते कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. याआधी सुद्धा अजित पवार यांनी शरद पवारांना राजकारणातून रिटायर्ड होण्याचा सल्ला दिला आहे.
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आगामी निवडणुकींच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती अजित पवार गटाकडून देण्यात आली आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.