अफगाणिस्तानविरुध्दच्या टी-२० मालिकेकरिता टीम इंडियाची घोषणा

07 Jan 2024 20:11:10
BCCI Announced ind vs afg t20 series squads

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुध्द कसोटी मालिका बरोबरीत सोडविल्यानंतर आता टीम इंडिया आपला मोर्चा आगामी अफगाणिस्तानविरुध्दच्या टी-२० मालिकेकडे वळविला आहे. याकरिता बीसीसीआयकडून टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत मैदानात उतरणार आहे.


दरम्यान, भारत विरुध्द अफगाणिस्तान यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका येत्या ११ जानेवारीपासून खेळविण्यात येणार आहे. या मालिकेसाठी आज ७ जानेवारी रोजी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला मोहाली तर दुसरा सामना १४ जानेवारीला इंदूर आणि अंतिम सामना १७ जानेवारीला बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

भारतीय संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शुभमन गिल, के एल राहुल, तिलक वर्मा, संजू सॅमसन(यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान संघ -

इब्राहिम झद्रान (कर्णधार), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, राशिद खान, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद आणि गुलबदीन नायब.
Powered By Sangraha 9.0