विधानसभाध्यक्ष नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; अपात्रता निकालावर चर्चा?

07 Jan 2024 16:24:31
Assembly Speaker Narvekar Mets CM Eknath Shinde

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी भेट झाली आहे. येत्या दोन दिवसात शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर न्यायालयात निकाल लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान,शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर निकाल देणार आहेत, त्यावर या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी तब्बल दीड तास दोघांमध्ये खलबतं चालली. त्यामुळे दोन दिवसांवर येऊन ठेपल्यावर आता मात्र, नेमकी काय चर्चा झाली यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

तसेच, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणावर निकाल देण्याकरिता १० जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत शिवसेना आमदारांचं भवितव्य निश्चित होणार आहे. या सर्व प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याकारणाने मुख्यमंत्री आणि विधानसभाध्यक्ष यांच्या आजच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Powered By Sangraha 9.0