लॅण्ड जिहादच्या माध्यमातून गड किल्ल्यांचं इस्लामीकरण सुरु आहे : नितेश राणे

06 Jan 2024 13:03:03

Nitesh Rane & Pawangadh Madarssa


कोल्हापूर :
लॅण्ड जिहादच्या माध्यमातून गड किल्ल्यांचं इस्लामीकरण सुरु आहे, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड जवळच्या पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनाने हटवलं आहे. रात्री उशीरा ही कारवाई सुरु करण्यात आली होती. दरम्यान, सुरक्षेसाठी याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
यावर प्रतिक्रीया देताना नितेश राणे म्हणाले की, "हे आमचं हिंदुत्त्ववादी विचारांचं सरकार आहे. इथे कुठलेही लॅण्ड जिहादचे प्रकार आम्ही सहन करणार नाही. असंख्य हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनेच्या मागणीमुळे पावनगडावरील अनधिकृत मदशाचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. या लॅण्ड जिहादच्या माध्यमातून आमच्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण, इस्लामिकरण करणं हे मोठ्या प्रमाणात सुरु होतं. पण यापुढे जिथे जिथे असे अतिक्रमण असेल ते या जिहाद्यांनी स्वत:हून काढून टाकावं. कारण आमचं हिंदुत्ववादी सरकार कुठलंही अतिक्रमण ठेवणार नाही असा ठाम विश्वास प्रत्येक हिंदुत्वावादी कार्यकर्त्याला आहे," असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0