अमेरिकन कंपनी FrontDesk ने केली २०० कर्मचाऱ्यांची कपात; गुगल मीटद्वारे दोन मिनिटात निर्णय

06 Jan 2024 16:38:54
FrontDesk Company Fires 200 People in two Minutes

नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी 'FrontDesk'ने आपल्या तब्बल २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. गुगल मीटद्वारे २ मिनिटांत निर्णय घेत ही कार्यवाही कंपनीने केली आहे. दरम्यान, कंपनीच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयानंतर कंपनीने दिवाळखोरी टाळण्यासाठी अर्ज केला आहे.
 
तसेच, 'FrontDesk' कंपनीने एकाच वेळी दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढतानाच सीईओ जेसी डीपिंटो यांनी कंपनीच्या कामकाजासाठी अमेरिकन सरकारकडे मदत मागितली आहे. ज्यायोगे कंपनीला दिवाळखोरीपासून वाचवता येईल.

त्याचबरोबर, सीईओ यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना Google मीट कॉल दरम्यान सांगितले की, कंपनी राज्य रिसीव्हरशिपसाठी अर्ज करत आहे. वास्तविक पाहता, अमेरिकेत ही प्रक्रिया दिवाळखोरीची पर्यायी व्यवस्था म्हणून गणली जाते. तर सदर कंपनी हे एक स्टार्टअप असून जे अपार्टमेंट भाड्याने देण्याचे काम करते. तसेच, 'FrontDesk' कंपनी ३० हून अधिक बाजारपेठांमध्ये कार्यरत आहे.

Powered By Sangraha 9.0