नाशिक : राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता अस वादग्रस्त विधान केल्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठीकठीकाणी आंदोलने केली जात आहेत. यामूळे हिंदूंच्या भावना दूखावल्या गेल्याने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महाराष्ट्रात निदर्शने केली जात आहेत. नाशिकच्या काळाराम मंदीराचे पुजारी महंत सुधीरदास यांनीही आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. त्याच बरोबर याला शरद पवार यांची मूक संमती आहे का असा सवालही त्यांनी उपस्थीत केला आहे.
आपल्या 'एक्स' अकांटवर पोस्ट करत महंत सुधीरदास यांनी शरद पवार यांच्यावर ही टीका केली आहे. शरद पवारांच्या समोर प्रत्येक वेळी हिंदू धर्म देव देवता यांचे अपमान केला जातो शरद पवारांची याला मुक संमती आहे का ? निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, मुख्यमंत्र्यांनी अहवाल सादर करावा आणि शरद पवार यांच्या पक्षाची पक्ष मान्यता रद्द करावी अस त्यांनी या पोस्टमध्ये म्हटल आहे.