एकेकाळी हिंदूंना संघटित करणे, गुलामगिरीची मानसिकता संपवणे आणि ‘स्व’वर आधारित राष्ट्रीय चेतना जागृत करणे केवळ अशक्यप्राय वाटत होते. मात्र, रा. स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेने परिस्थिती प्रतिकूल असताना देखील तसे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ४० वर्षांपूर्वी सर्व संत समाज आणि अनेक संस्था आणि संघटनांना एकत्र आणले आणि रामजन्मभूमी चळवळ सुरू केली. एका ठिणगीची गरज होती आणि भगवान श्रीराम ही ती ठिणगी होती, जी हिंदू समाजाची ऊर्जा जागृत करण्यासाठी साहाय्यक ठरली.
समाजाची मानसिकता जेव्हा गुलामगिरीचा स्वीकार करते, तेव्हा राष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावतो. आक्रमणकर्त्यांनी विकसित केलेल्या गुलामगिरीच्या मानसिकतेचा परिणाम म्हणून आपण अनेक शतके सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक विकासावर होणारा नकारात्मक प्रभाव सहन करत आहोत आणि आपल्याला आपल्या संस्कृतीची, अस्मितेची आणि सभ्यतेची लाज वाटू लागली होती. एखाद्या राष्ट्राच्या विकासाचे मोजमाप केवळ रस्ते, महामार्ग, उंच इमारती आणि बंदरे या भौतिक विकासाच्या आधारे करता येत नाही; तर ते सांस्कृतिक आणि भावनिक संबंधांवर देखील अवलंबून असते. समृद्ध संस्कृतीचे अवमूल्यन, सामाजिक-आर्थिक परिस्थितीतील बिघाड आणि आक्रमणकर्त्यांची गुलामगिरी, ही त्यावेळी कोणत्याही देशभक्तासाठी प्रमुख चिंता होती. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी भारतीयांची गुलामगिरीची मानसिकता ओळखून, प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी बदलण्यासाठी काम करण्याचा संकल्प केला व ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना आणि सनातन तत्त्व आधारित भारताच्या सांस्कृतिक आणि भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला समाज विकसित करण्याच्या मार्गावर प्रवास सुरू केला.
डॉ. हेडगेवार यांनी १९२५ मध्ये ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना केली आणि अनेक आव्हाने असतानाही, त्यांनी हिंदुत्वाच्या ध्वजाखाली लोकांना एकत्र आणण्याचे त्यांचे प्रयत्न चालू ठेवले. जेव्हा आपण पाहतो की, आज भारत मोठ्या गतीने प्रगतिपथावर आरूढ आहे आणि दि. २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम यांच्या अभिषेकाने जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आकांक्षा कशा पूर्ण केल्या, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की, हे कोणत्या ईश्वरीय शक्तीने शक्य केले. डॉ. हेडगेवार, माधव गोळवलकर गुरुजी आणि इतर सरसंघचालकांचे तसेच लाखो स्वयंसेवक आणि अनेक संस्था व संघटनांचे कार्य अभ्यासले, तर देशाचे वैभव पुनर्संचयित करण्यासाठी केलेले अथक परिश्रम, आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात आणि पुढील काही वर्षांत आपण ‘विश्वगुरू’ या भूमिकेत जगाला मार्ग दाखवू, यावर विश्वास आणखीन वृद्धिंगत होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या निकालानंतर काय झाले, त्याचा नीट अभ्यास केला, तर लक्षात येते की, भारतीयांचा ‘स्व’ जागृत होत आहे. देशभरातील ५ लाख, ७४ हजार गावांमधील कोट्यवधी कुटुंबांनी भव्य श्रीराम मंदिरासाठी देणग्यांद्वारे हिंदू (जैन, बौद्ध आणि शिखांसह) एकत्र येत आहेत हे दर्शवले. आताही, मागच्या दोन महिन्यांत, ज्या प्रकारे संपूर्ण हिंदू समाज अक्षता वाटपासाठी आणि दि. २२ जानेवारी २०२४ रोजी शोभायात्रा आणि अनेक कार्यक्रमांसाठी एकत्र आला, त्यावरून हिंदू पुन्हा जागृत झाले आहेत, भावनिकरित्या एकमेकांशी जोडले गेले आहेत आणि सांस्कृतिकदृष्ट्या एकत्र आले आहेत, हे स्पष्टपणे जाणवते. ही ऊर्जा, एकता आणि उत्सव आजही जगभरात चर्चेचा विषय आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत या दोन संघ स्वयंसेवकांच्या हातून संपन्न झालेली रामललाची प्राणप्रतिष्ठापना लाखो कारसेवकांनी केलेल्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देणारी ठरली.
एकेकाळी हिंदूंना संघटित करणे, गुलामगिरीची मानसिकता संपवणे आणि ‘स्व’वर आधारित राष्ट्रीय चेतना जागृत करणे केवळ अशक्यप्राय वाटत होते. मात्र, रा. स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेने परिस्थिती प्रतिकूल असताना देखील तसे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ४० वर्षांपूर्वी सर्व संत समाज आणि अनेक संस्था आणि संघटनांना एकत्र आणले आणि रामजन्मभूमी चळवळ सुरू केली. एका ठिणगीची गरज होती आणि भगवान श्रीराम ही ती ठिणगी होती, जी हिंदू समाजाची ऊर्जा जागृत करण्यासाठी साहाय्यक ठरली. संघर्ष, चळवळी, वैविध्यपूर्ण उपक्रम आणि देणग्या गोळा करणे आणि अक्षता वितरित करणे, याची पद्धतशीर रचना आणि कार्यपद्धती यासाठी विविध विद्यापीठे, संस्था आणि विचारवंत यांच्याकडून सखोल अभ्यास आणि विश्लेषण आवश्यक आहे. कोणत्याही आर्थिक लाभाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे कसं घडवून आणता येतं? रा. स्व. संघ आणि विहिंपचे कार्य जगभरातील शाळांमध्ये शिकवले पाहिजे, जेणेकरून भावी पिढ्यांमध्ये नेतृत्व गुण आणि जीवन कौशल्य निर्माण होतील.
अल्पावधीतच देशभरातील कोट्यवधी कुटुंबे आणि लाखो गावे प्रभावीपणे, पद्धतशीर आणि तांत्रिकदृष्ट्या ‘कव्हर’ केली गेली. कोणतेही मतभेद किंवा जातीय भेदभाव बाजूला ठेवून, ते चळवळीशी पूर्णपणे वचनबद्ध झाले आणि जागृत जाणिवेने भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एकरूप झाले. देशभरात आणि जगभर तसेच गावाच्या कानाकोपर्यात होणारे अनेक उत्सव या प्रमुख ऐतिहासिक घटनेची भव्यता आणि दिव्यता दर्शवतात. सामाजिक-आर्थिक पैलूंवर अनुकूल प्रभाव हादेखील एक घटक आहे, ज्याचे परीक्षण आणि विश्लेषण केले पाहिजे. ‘सनातन धर्म’ आणि ‘भारत’ या संकल्पनेला विरोध करणार्यांना हिंदू एकात्मतेची भीती वाटते. त्यांचा असा विश्वास आहे की, हिंदू एकता या विशाल राष्ट्राच्या सकारात्मक भावनेला चालना देईल आणि ‘विश्वगुरू’ बनवून सामाजिक-आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विकसित होण्यास मदत करेल. हिंदुत्वाचा द्वेष करणार्यांनी सत्य ओळखावे, गतिमान विकासात सहभागी व्हावे आणि स्वार्थाऐवजी मानवजातीसाठी कार्य करावे. त्यांच्या कारस्थानांचा आणि टूलकिटचा बहुसंख्य हिंदूंवर फारसा प्रभाव पडणार नाही. धर्मांतर माफियांनी हिंदूंच्या मनात धर्मांतरासाठी विष पेरणे थांबवावे; आता एकजूट हिंदू भक्कम आणि कायदेशीर लढा देतील. घरवापसी खूप वेगाने होईल. विकासाचे इंजिन सर्वांसाठी पूरक, शाश्वत विकासाकडे वाटचाल करू लागेल, ज्यासाठी प्रत्येक देश प्रयत्नशील आहे.
आपल्या भाषणात डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, ५०० वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम यांचे आगमन प्रत्येक भारतीयामध्ये ’स्व’ जागृत करेल. हे ‘स्व’ व्यक्ती, सामाजिक गट आणि राष्ट्रांना नैतिक वृत्ती आणि आदर्श विकसित करण्यासाठी आवश्यक विचार प्रदान करेल. समाज, राष्ट्र आणि पर्यावरणाप्रति स्वार्थ आणि नकारात्मक दृष्टिकोन संपेल. ‘स्व’ बाह्य वातावरण शुद्ध करून, आंतरिक चैतन्य उन्नत करेल. ‘स्व’ भारतीयांमध्ये आत्मनिर्भरता वाढवेल, प्रत्येक व्यक्तीला सामंजस्याने प्रगती करण्याची संधी देईल आणि त्याच वेळी जागतिक स्तरावर सर्वांना सर्व प्रकारे फायदा होईल. ‘स्व’ प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिकरित्या उन्नत करेल, त्यांच्या जीवनात आंतरिक आनंद आणि सकारात्मक ऊर्जा आणेल. ‘स्व’ विकसित देशांना शाश्वत विचारांवर आधारित भारतासोबत काम करण्यास मदत करेल. हा ‘स्व’ सर्व जातींना समान वागणूक देईल आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक भर देऊन सर्वांना एकत्र आणेल. ‘स्व’ समाजाला बळकट आणि प्रगत करण्यासाठी सांस्कृतिक वारसा पुनर्संचयित करेल. ‘स्व’ लोकांना त्यांच्या सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदार्यांची जाणीव करून देईल. ‘स्व’ वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विकासावर लक्ष केंद्रित करेल. ‘स्व’ लोकांना इतिहासात खोलवर जाऊन हिंदुत्व आणि राष्ट्राला हानी पोहोचवणार्या चुका सुधारण्यास भाग पाडेल. ‘स्व’ अन्यायाविरुद्धच्या लढ्यात मनोबल वाढवेल आणि गरीब किंवा गरजूंना वेळेवर न्याय मिळवून देईल. ‘स्व’ आपल्याला प्रभू श्रीराम, भगवान कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, आचार्य चाणक्य आणि वैदिक तत्त्वांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची प्रेरणा देईल. ‘स्व’ राजकीय, न्यायिक, मीडिया आणि लोकशाही प्रणालींची कार्यक्षमता, परिणामकारकता आणि नैतिकता सुधारेल. ‘स्व’ अखेरीस रामराज्य निर्माण करेल; पण हा प्रचंड बदल घडवून आणण्यासाठी हिंदू एकात्मता आवश्यक आहे. रा. स्व. संघ आणि संबंधित संघटना आणि संस्था केवळ याच कारणासाठी लढत आहेत; निःसंशयपणे, या महान कार्यासाठी सर्वांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे.
जय श्रीराम!
पंकज जयस्वाल
७८७५२१२१६१