नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाचे माजी प्रमुख अनिल कुमार लाहोटी यांची भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लाहोटी यांची पुढील तीन वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, माजी ट्राय प्रमुख पीडी वाघेला यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर अध्यक्षपद नोव्हेंबर २०२३ पासून रिक्त होते.
दरम्यान, अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वे बोर्डात उत्तर, मध्य, उत्तर मध्य, पश्चिम आणि पश्चिम मध्य रेल्वेमध्ये विविध पदांवर काम केले. त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये तब्बल ३६ वर्षे सेवा बजावली आहे. तसेच, लाहोटी हे ट्राय सदस्य मीनाक्षी गुप्ता यांच्याकडून पदभार स्वीकारतील. त्यांच्याकडे सध्या उच्च पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.