'चांद'ने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; जबरदस्तीने धर्मांतर करुन लग्नही केले

31 Jan 2024 12:05:18
 LOVE JIHAD
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचे जबरदस्ती धर्मांतर आणि विवाह केल्याची घटना समोर आली आहे. मुलीला आमिष दाखवून फसवण्यात आले. त्यानंतर तिचे धर्मांतर करुन तिला 'शबनम' असे नवीन नाव देण्यात आले. आरोपीने संमती न घेता मुलीशी लग्नही केले. 'नारी उत्थान केंद्र'च्या सदस्या उषा शर्मा यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे तरुण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
 
एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चांद असे आरोपीचे नाव असून तो हसनपूर कोतवाली भागातील शाहपूर कलान गावचा रहिवासी आहे. पीडितेचे कुटुंब संभल जिल्ह्यातील राजपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. शनिवारी (२७ जानेवारी २०२४) दुपारी मुलीचे अपहरण करून तिला अमरोहा येथे नेण्यात आले. असा आरोप करण्यात आला आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0