हिंदूंचा मोठा विजय: ज्ञानवापीत पूजेला कोर्टाची परवानगी

31 Jan 2024 19:01:15
gyanvapi
 
लखनौ : वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने बुधवारी ३१ जानेवारीला एतिहासिक निर्णय देत ज्ञानवापी परिसरातील व्यासजी का तेहखाना ( तळघर ) या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली आहे. सात दिवसांत तळघरात पूजा करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. हे तळघर ज्ञानवापी परीसरात असलेल्या मशिदीच्या खाली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता तेथे नियमित पुजा विधी होणार आहेत. काशी विश्वनाथ न्यास तर्फे येथे पुजा करण्यात येणार आहे.
 
शैलेंद्र कुमार पाठक यांनी ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यास जी का तहखाना येथे प्रार्थना आणि पूजा करण्याचा अधिकार मागणारी याचीका न्यायालयात दाखल केली होती. ३० जानेवारीपर्यंत निकाल राखुन ठेवल्यानंतर जिल्हा न्यायाधिशांनी या प्रकरणावर आज निकाल दिला आहे.
 
जिल्हा न्यायाधीश न्यायमूर्ती अजय कृष्ण विश्वेश यांनी जिल्हाधीकारी वाराणसी यांना दिलेल्या आदेशानुसार सात दिवसांमध्ये तळघरात पुजा करण्याची, व सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी अस म्हटलं आहे. लोखंडी कुंपण व इतर आवश्यक व्यवस्था करण्यासही सांगण्यात आले आहे. 

Powered By Sangraha 9.0