मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतातील बिम बिबट्यांच्या स्थितीचा अहवाल मंगळवार दि. ३० जानेवारी रोजी भारताचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. दिल्लीमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या सभेत हा अहवाल प्रकाशित करण्यात आला असून भारतात एकुण ७१८ हिम बिबट्यांची नोंद करण्यात आली आहे.
भारतातील ही पहिलीच हिम बिबट्यांची नोंदणीकृत यादी असून हे सर्वेक्षण वाईल्डलाईफ इंस्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेअंतर्गत केले गेले. यामध्ये नेचर कॉन्झरवेशन फाऊंडेशन आणि वर्ल्ड वाईड फंड इंडिया या संस्थांचा ही हातभार होता. या सर्वेक्षणामध्ये म्हणजेच (SPAI: Snow Leopard Population Assessment in India ) ७० टक्क्यांपेक्षा अधिक हिम बिबट्यांचा अधिवास समाविष्ट केला असून लडाख, जम्मू आणि कश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशांसह, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्ये तसेच, ट्रान्स-हिमालयीन प्रदेशात अंदाजे १२०,००० चौ.किमीचे सर्वेक्षण पार पाडले आहे.
विशेष म्हणजे, यामध्ये १३,४५० चौ. किमी पायवाटांबरोबरच सर्वेक्षण, १९७१ ठिकाणांवर कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले होते. एकुण तब्बल २४१ विविध प्रकारचे वैशिष्ट्य असलेले हिम बिबटे यावेळी बघितले गेले.
विविध राज्यांतील हिम बिबट्यांची अंदाजे लोकसंख्या खालीलप्रमाणे आहे: