पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना का झाली १० वर्षांची शिक्षा?

30 Jan 2024 16:03:19
cypher-case-former-pm-imran-khan-qureshi-10-years-jail

नवी दिल्ली :
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सिफर प्रकरणात १० वर्षांचा शिक्षा सुनावण्यात आली आहे. अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्यासह माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना सिफर प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

दरम्यान, सत्तेपासून दूर झालेल्या इम्रान खान हे सिफर प्रकरणात पुन्हा एकदा गोत्यात आले आहेत. माजी मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून पीटीआय समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सिफर प्रकरण नेमकं आहे काय?

पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना राज्य गुपिते लीक केल्याच्या प्रकरणात प्रत्येकी १ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले. दरम्यान, अधिकृत गुपित कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते इम्रान खान आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, डॉनने वृत्त दिले आहे.

रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी हा निकाल जाहीर केला. डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान आणि कुरेशी यांना १३ डिसेंबर रोजी या प्रकरणात दुसऱ्यांदा दोषी ठरवल्यानंतर विशेष न्यायालयाने गेल्या महिन्यात अदियाला जिल्हा कारागृहात नव्याने सिफर सुनावणी सुरू केली होती. त्यानंतर दोघांना दोषी ठरवत न्यायालयाकडून दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0