हिंद महासागराचा भारतच रक्षक! १९ पाकिस्तानींचा वाचवला जीव

30 Jan 2024 12:09:00
 indian navy
नवी दिल्ली : भारतीय नौदलाची युद्धनौका INS सुमित्रा ने कोचीच्या किनारपट्टीपासून सुमारे ८०० मैल दूर समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या अल नामी या मासेमारी जहाजाची सुटका केली आहे. सोमाली चाच्यांविरुद्ध भारतीय नौदलाची कारवाई सुरूच आहे. भारतीय नौदलाने २४ तासांत दुसऱ्यांदा अल नामी या मासेमारी जहाजाची सुटका केली आहे.
 
भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोनी अल नामी जहाजात असलेल्या क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, आयएनएस सुमित्रा यांनी सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ आणखी एक यशस्वी चाचेगिरीविरोधी ऑपरेशन केले आहे. भारतीय नौदलाने सोमाली चाच्यांपासून मासेमारी जहाज अल नामी आणि त्याच्या क्रूची सुटका केली आहे. या जहाजावर १९ पाकिस्तानी नागरिकही होते.
 
इस्रायल- हमास युद्धात हमासला पाठिंबा देत, हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ले सुरु केले आहेत. याचा अशांततेचा फायदा घेत. सोमालियातील चाच्यांनी सुद्धा जहाजांवर हल्ले करुन लूटमार सुरु केली आहे. त्यामुळे हिंद महासागरात भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0