किशोरी पेडणेकरांची 'ईडी'कडून सात तास चौकशी

    30-Jan-2024
Total Views |
Former Mayor Kishori Pednekar ED Enquiry

मुंबई :
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  तब्बल सात तास चौकशी केली. कोरोनाकाळात शवपिशव्यांच्या खरेदीत घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

मुंबई महानगरपालिकेने कोरोनाकाळात बॉडी बॅग्जची खरेदी वाढीव दराने केली. त्यासाठी संबंधित कंत्राटदारालाच हे कंत्राट देण्यात यावे, असे आदेश तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करीत आहे.