श्रमजीवी एक्स्प्रेस ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात २ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा

03 Jan 2024 18:15:05
 terrorist
 
लखनौ : न्यायालयाने श्रमजीवी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये करण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी बांगलादेशचा रहिवासी हिलालुद्दीन उर्फ हिलाल आणि बंगालचा रहिवासी नफीकुल बिस्वास या दोन्ही दोषी दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली. दि. २८ जुलै २००५ रोजी (२००५ जौनपूर ट्रेन बॉम्बस्फोट) बॉम्बस्फोट प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश कुमार राय यांनी बुधवारी दुपारी ४.१५ वाजता दोन्ही दहशतवाद्यांना सजा सुनावली.
 
सुनावणीच्या वेळी न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. शिक्षा सुनावल्यानंतर दोषींना कडेकोट बंदोबस्तात जिल्हा कारागृहात नेण्यात आले. दोन्ही दहशतवाद्यांना २२ डिसेंबर रोजी दोषी ठरवण्यात आले होते. श्रमजीवी एक्स्प्रेस ट्रेन बॉम्बस्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला होता, तर ६२ जण जखमी झाले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0