प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा मुंबई दौरा; आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी

03 Jan 2024 18:54:16
BJP State President Chnadrashekhar Bawankule on Mumbai Tour

मुंबई :
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी‘महाविजय-२०२४’अंतर्गत चार दिवसांच्या मुंबई लोकसभा मतदारसंघ प्रवासाला दोन जानेवारीला सुरुवात झाली. या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी ०४ जानेवारी २०२४ रोजी ते मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य मुंबई ) लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. या दौऱ्यात बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी मुंबई भाजप अध्यक्ष आ. आशिष शेलार, इशान्य मुंबईचे खा. मनोज कोटक, उत्तर मुंबईचे खा. गोपाळ शेट्टी, घाटकोपर पश्चिमचे आ. राम कदम, मुलुंडचे आ. मिहीर कोटेचा, घाटकोपर पूर्वचे आ. पराग शाह, बोरीवलीचे आ, सुनील राणे, दहीसरच्या आ. मनीषा चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, मुंबई-उत्तर-पूर्व लोकसभा समन्वयक भालचंद्र शिरसाट, मुंबई उत्तर लोकसभा समन्वयक आ. योगेश सागर, मुंबई उत्तर-पूर्व जिल्हाध्यक्ष अशोक राय, मुंबई उत्तर जिल्हाध्यक्ष गणेश खनकर, सुहास अडिवरेवर व राजेश सिंग यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.

Powered By Sangraha 9.0